
वाळूज महानगर, (ता 27) – संविधान दिनानिमित्त बजाजनगर–वडगाव कोल्हाटी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुधवारी 26 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करून संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे सचिन गरड, रजेंद्र अवतरे, विष्णू खेडकर, गजानन नांदुरकर, प्रा.संजय सांभाळकर, गरुड झेपचे निलेश सोनवणे, सुनील राठी, नरेंद्र यादव, भरत सलामपुरे, गणेश आव्हाड, मच्छिंद्र पुलावळे, आसाराम करपे, शत्रुघन देशमुख, किशोर खांडरे, मनोज कुलकर्णी, रमेश बागुल, विजय सरकटे, अंकुश पुंड, एकनाथ म्हस्के, तुषार ढवळे, एकनाथ नाईक, यमराज गिरे, भगवान गायकवाड.गौरव खणसे.किरण पन्हाळे. लक्ष्मण बहिर, अक्षय शिंदे, सखाराम ढवळे, अशोक पाटोळे, महिला मोर्चाच्या सुनिताताई अहिरे, नंदाताई राजपूत, लताताई माळी, सविताताई हिरे, सत्यभामा कायंदे, मनीषाताई देशमुख, अंजलीताई देशमुख यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, महिला व पुरुष सभासद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने संविधान दिन साजरा करून संविधानाबद्दल जनजागृती करण्याचा उद्देश या कार्यक्रमातून अधोरेखित केला.

Leveraging AI for smarter betting strategies is key. Tools like the AI Repurpose Assistant can help streamline data-driven decisions with ease and precision.