May 10, 2026

वाळुज महानगर, (ता.7) – आषाढी एकादशी निमित्त बजाजनगर येथील पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पहिल्याच वर्षी बाळ-गोपाळांनी पालखी व पायी दिंडी काढुन शाळेने परिसरातील लोकांचे मन अकर्षित केले.

या दिंडीत साक्षात विठ्ठल आणि रुक्खमिनीची चिमुकल्यांनी वेशभूषा परिधान करून पालकांचे मन जिंकली आणि मान्यवरांच्या हस्ते आरती करून पालखीला सुरुवात करण्यात आली. तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, मुक्ताई, सोपान महाराज अशा अनेक संताचे उभेउभ पाञ निभावुन चिमुकल्यांने पंचक्रोशीतील लोकांची मने जिंकली. या विशेष मिरवणुकीसाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ चंद्रकांत मल्हारे, संस्थेचे उपाध्यक्ष व्यंकटराव मल्हारे व सचिव अंजली मल्हारे, आणि शाळेतील शिक्षक सुशांत धुमाळ, अविनाश, भाग्यश्री झोरे, सिता माकोडे, अणुराधा खर्जुले, भाग्यश्री खंदारे, वैशाली ताई आदींनी पालखी मिरवणुक काढण्यासाठी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *