November 11, 2026


वाळूज महानगर – चारचाकी वाहनातून जाणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणावर तीन जणांनी हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. जुन्या भांडणाच्या कारणावरून झालेली ही घटना धुळे सोलापूर रोडवर हॉटेल अद्वितजवळ 5 नोव्हेंबर रोजी 11:45 वाजेच्या सुमारास सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय छोटूराम बडोगे वय 31 वर्ष, रा. तिसगाव ता. जि.छत्रपती संभाजीनगर हे स्वतःची चारचाकी गाडी घेऊन तिसगाव चौफुली येथून साजापूर चौफुलीकडे जात असताना त्यांच्या ओळखीचे आरोपी विकास चव्हाण, नामदेव रोरे, योगेश रोरे रा. तिसगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अक्षयला शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण केली. व धारदार वस्तूने त्याच्या पाठीवर वार करून जखमी केले. धुळे सोलापूर हायवे रोडच्या बाजूला हॉटेल अद्वित जवळ 5 नोव्हेंबर रोजी 11:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 118(1),352,351,(2) 3(5) बिएनएस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *