March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.29) – चोऱ्या, माऱ्या किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी आपले अस्तित्व लपवून फिरणाऱ्या बावीस वर्षीय आरोपीस वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (ता.29) रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जेरबंद केले.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज एमआयडीसी पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असताना सिडको वाळूज महानगर -1, येथील ऑर्चिड शाळेजवळ आरोपी अभिषेक महेश गोसावी (वय 22) रा. न्यू नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा ता. जि. छत्रपती संभाजीनगर हा त्याचे अस्तित्व लपवून अंधारात चोऱ्या, माऱ्या किंवा मालाविरुद्धचा दखलपात्र गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत होता. त्याला शुक्रवारी (ता.29) रोजी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास पकडून जेरबंद करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानोबा सुधाकर चौबे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 122 म पो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश तारव करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *