
वाळूजमहानगर, (ता.27) – रांजणगाव येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली शहीद दिनाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संचालक अक्षय हरकळ, आदिनाथ आडसरे, संगीता मुंडकर, किरण निकम, इस्माईल शेख यांची उपस्थिती होती.
प्रथम मान्यवरांचे हस्ते शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तदनंतर शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच काही विद्यार्थ्यांनी शहीद दिनानिमित्त विविध देशभक्तीपर गीतांचे गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार भारत शिनगारे यांनी मानले.
