March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता नरेंद्रसिंह यादव यांची नियुक्ती करण्यात आली. राज्यमंत्री भागवत कराड यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र उत्तर भारतीय संघटनेचे उपाध्यक्ष लेखराज सोळंकी यांच्या शिफारशीवरून जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी ही नियुक्ती केली.

या नियुक्तीमुळे पंढरपूर येथील सम्यक गार्डन, सहारा विहार सोसायटीच्या वतीने नरेंद्र सिंह यादव यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुकेशचंद्र शर्मा, सुनील भराटे, नंदकिशोर सिंग यांच्यासह उत्तर भारतीय संघटनेचे अध्यक्ष आर के सिंग, राजेश सिंग, कैलास यादव, राजेंद्र कासलीवाल, विजय सारडा, गुलाब घाटुळ, संदीप इनामके, संजय महाजन, जीवन गंगवाल, राघवेंद्र प्रताप सिंह, अनिलकुमार सिंह, सुरेंद्र सिंग, रुद्रप्रताप सिंग, रामजनम सिंग, डॉ. प्रदीप सिंग, कुंदन त्रिपाठी, अरुणकुमार सिंग, अरुण गिरी, विनोद गिरी, राजेश यादव, भूमिपुत्र संघटनेचे पोपटराव अधिक पाटील, मोरे पाटील, रामदास पैठणपगारे, ज्ञानेश्वर अधिक, संजय महाजन, सारंगधर जाधव, भास्कर जाधव, रामराव बोरुडे, जयकुमार, वाजपेयी, गोविंद माळी आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *