March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) -खेळता खेळता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे बुधवारी (ता.20) रोजी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील बबन कुमार भारती यांची मुलगी अग्नी भारती वय 3 वर्ष 6 महिने ही शुक्रवारी (ता.15) रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास राहते घराच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत असतांना खाली पडुन गंभीर जखमी झाली. तिला बबन कुमार भारती यांनी उपचारार्थ घाटी दवाखाना अपघात विभागात आणुन दाखल केले व तिचेवर वार्ड क्र. ट्रॉमा केअर येथे उपचार चालु असतांना ती बुधवारी (ता.20) रोजी 2 वाजेच्या सुमारास मरण पावली. याप्रकरणी घाटी मेडिकल चौकीतून एस.डी.सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *