March 23, 2026

वाळुज महानगर (ता.16) – गंगापूर तालुक्यातील वाळूज, कमळापूर, रांजणगाव, जोगेश्वरी आदी ठिकाणी आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच 90 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार सतीश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी या गावांना भेटी दिल्या असता नागरिकांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आमदार सतीश चव्हाण यांनी वाळुज येथील नृसिंह विद्यामंदिर ते पत्रा कॉलनी या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी दहा लक्ष, जोगेश्वरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये ड्रेनेजलाईन करण्यासाठी 10 लक्ष, ईदगहा परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 10 लक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कमान ते डॉ.आंबेडकर स्मारकापर्यंत खडीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी 10 लक्ष, जोगाईमाता मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 5 लक्ष, रांजणगाव येथे वार्ड क्रमांक 6 मध्ये सिमेंट रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, गाव अंतर्गत सीसी रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, वार्ड क्रमांक 2 मध्ये सी सी रस्ता करण्यासाठी 10 लक्ष, कमळापूर येथे गाव अंतर्गत सीसी रोड करण्यासाठी 10 लक्ष असा एकूण 90 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ही कामे पूर्ण झाले असून या कामाचे लोकार्पण आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड, ज्ञानेश्वर दुधारे, नितीन कोळेकर, सरपंच सईदा पठाण, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती मनोज जैस्वाल, नबी पठाण, अमजद खान, नदीम झुंबरवाला, लक्ष्मण पाठे, नंदू सोनवणे, रियाज शेख, पोपट बनकर, रवींद्र शिरसाठ, संजय काजळे, सूरेश वाघमारे, नितीन साबळे, तुषार कुंजर, अक्षय भवर, शकील शेख, वसीम पठाण, अरुण साबळे, दयानंद साबळे, साईनाथ वाघमारे, राहुल शेवाळे, नाजीम पठाण, भारत गरड, सुरेश बोऱ्हाडे, सुरेश बोकण, मनोहर गवई, कृष्णा लोहकरे, मुसाभाई, संतोष कवडे, महेश पाटील, शुभम गाडेकर, श्याम बोकण, गणेश गाडेकर, जगदीश अपार, केशव गायके, नितीन कोळेकर, उपसरपंच नजीर पठाण, प्रकाश साबळे, सलीम पठाण, अनिल पवार, अझहर शेख, मुख्तार पठाण, शेख नजीर, नितीन पवार, रमेश ठोकळ आदींची उपस्थिती होती.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील शांतीनगर मध्ये मागील 25 वर्षांपासून चांगला रस्ता नव्हता. आमदार सतीश चव्हाण या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिले असता तेथील नागरिकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. गल्लीतून फिरतांना आमदार सतीश चव्हाण यांचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच फुलांचा अगदी वर्षाव करण्यात आला. घरोघरच्या महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांचे स्वागत केले. केलेल्या कर्तव्य पूर्तीचा हा आनंदी क्षण अनुभवतांना आमदार सतीश चव्हाण यांना गहिवरून आले. लोकांनी दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी लाख मोलाचा ठरेल असा विश्वास यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *