
वाळूजमहानगर, (ता.15) – वाळूज औद्योगिक क्षेत्रात नेहमी कामगारांची वर्दळ असलेल्या बजाजनगर या भागातील विविध रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसी अंतर्गत 15 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.15) रोजी करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, हर्षदा शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अंबादास म्हस्के, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, वडगाव (को.)-बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, ग्रामपंचायत सदस्या माधुरी राजन सोमासे, महिला आघाडीच्या जयश्री घाडगे, उषा हांडे, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कसूरे, श्रीकांत साळे, सिडको वाळूज महानगर-1 विभागप्रमुख राजन सोमासे,
पोपट हांडे, संजय शहाणे, रमाकांत भांगे, संतोष नरवडे, राम पाटोळे, विष्णू उगले, प्रकाश भोसले, ज्ञानेश्वर गायकवाड, नागेश कुठारे, रमेश पाटील, अशोक लगड, पोपटराव आदिक पाटील, वासंती पाटील, सुरेखा लगड, दुर्गा मिसाळ, छाया प्रधान, वर्षाराणी सानप, तारामती शिंदे, स्वाती जाधव आदींची उपस्थिती होती.
बजाजनगर या भागात सर्वसामान्य लोक पोटाची खळगी भरण्यासाठी वाळूज औद्योगिक क्षेत्रात असलेल्या विविध कंपनीमध्ये काम करतात. त्यांना सर्व सोईसुविधा मिळाल्या पाहिजे. म्हणून या परिसरातील सर्व रस्त्याकरिता शासनाकडून 15 कोटींचा निधी मंजूर झाला. या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (ता.15) रोजी करण्यात आले. उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून बजाजनगर येथील रस्त्यावर खड्डे पडले होते. आणि ड्रेनेज लाईनची कामे देखील होत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आचार संहिता लागण्यापूर्वीच या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
