March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.15) – “कारखाना म्हणजे निर्जीव यंत्रांची सजीव माणसाशी सांगड नसून श्रमशक्तीच्या उपासनेचे ते एक मंदिर आहे”. अशी आपली दृष्टी झाली तरच कारखान्यांमधून मानवी जीवनाचा सहजीवनाचा सुगंध त्यातून येत असल्याची अनुभूती येते. म्हणूनच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यामध्ये आपण माणसांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्रधान्य दिले पाहिजे. असे मार्गदर्शन इप्का लॅबोरेटरीजचे मानवसंसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी केले.


वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 4 ते 11 मार्च दरम्यान साजरा करण्यात आला. यावेळी ची सुरवात ही सुरक्षेची शपत घेऊन करण्यात आली. पथनाट्य, सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा साधने परिधान करणे, चालत बोलता अश्या अनेक व विविध कार्यक्रम राबवून त्यामधून सुरक्षेचे महत्व पटवून दिली गेले व बक्षीस वितरण करून सुरक्षा सप्तहाची सांगता 11 मार्च रोजी करण्यात आली.
यावेळी डॉ. व्यंकट मैलापुरे पुढे बोलताना म्हणाले की, कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये सुरक्षितता आणि आरोग्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस पाळला जातो. प्रत्येक वर्षी, राष्ट्रीय सुरक्षा दिवस एका विशिष्ट थीमसह साजरा केला जातो. या वर्षाची राष्ट्रीय सुरक्षा दिवसाची थीम “इएसजी उत्कृष्टतेसाठी सुरक्षा नेतृत्वावर लक्ष केंद्रित करा” ही आहे.

कारखान्यातील फक्त कामगारच नव्हे तर आत उत्पादन प्रक्रियेत काम करणारी प्रत्येक व्यक्ती सुरक्षित असलीच पाहिजे यावर आपला कटाक्ष असले पाहिजे. कारखान्यात होणारे कोणतेही अपघात मुख्यत्वे सुरक्षा नियमांची पायमल्ली, बेपर्वावृत्ती, अपुरे ज्ञान, निष्काळजीपणा, अर्धवट प्रशिक्षण आदीमुळे होतात असे अभ्यासांती निदर्शनास आलेले आहे. सुरक्षितता ही एक दिवसाची नसून वर्षाचे 365 दिवस, 12 महिने आणि 24 तास अविरत चालणारे चक्र आहे. आणि कारखान्यात काम करणारा प्रत्येक जण सुरक्षित राहावा याकरिता व्यवस्थापनाने हे सुरक्षा चक्र सतत फिरते ठेवले पाहिजे. औद्योगिक सुरक्षेचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. आपल्याला लाभलेले मानवी जीवन हे परमेश्वराने दिलेली अमुल्य देणगी आहे, याचा थोडासुद्धा विसर पडू देऊ नये. आपल्या मनात सुरक्षिततेची भावना जागृत ठेवली तरच सुरक्षा या शब्दाचा आपणास अर्थ पुरेपूर कळला आहे असे म्हणता येईल. असेही डॉक्टर मैलापुरे म्हणाले.
यावेळी इप्का लॅबोरेटरीज सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष भावेश त्रिवेदी, अनिक पटेल, अजिनाथ सुरवसे, परवेज खान, संदीप सावरखेडकर, मधुकर गीते, रमेश बिरादार, बबन काळे, आकाश पुंड, सुनील सेशपांडे, प्रफुल्ल कांबळे व कंपनीतील कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *