March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.17)- जिल्हा परिषद प्रशाला रांजणगाव (शेणपुंजी) येथे परिवर्तन जनसेवा फाउंडेशन व पेस ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसन विरोधी अभियान अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसन विरोधी शपथ घेतली.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय चौधरी होते. यावेळी परिवर्तन जनसेवा फाउंडेशनच्या प्रशिक्षक श्रीमती ऐश्वर्या मोहिते यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सांगितले की, व्यसन म्हणजे माणसाची एखाद्या पदार्थावर असणारी रासायनिक अधिनता ज्यामुळे एखाद्या गोष्टीची सवय नव्हे खोडच लागते आणि त्या पदार्थाचा वापर थांबवला की, शारीरिक व भावनिक त्रास होतो. व्यसन हा एक आजार आहे व तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. वेसन सोडविण्यासाठी त्या गोष्टीचा त्याग करणे हाच एकमेव उपाय आहे. तसेच व्यसनाधिन व्यक्ती हा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आयुष्यात अनेक समस्याना तोंड देत असतो. म्हणून व्यसन जडल्यानंतर ते सोडवण्यासाठी परकाष्टा करूनही अनेकदा यश मिळत नाही. आणि गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागते. यासाठी व्यसन जडण्यापूर्वीच व्यसनाच्या गंभीर परिणामाची काही उपयुक्त माहिती तरुण पिढींना असणे उपयुक्त आहे. यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचे सांगत व्यसन विरोधी अभियान प्रशिक्षणात श्रीमती ऐश्वर्या मोहिते यांनी व्यसन काय आहे, त्यावर मानवी जीवनात काय परिणाम होतो. हे चित्रफित दाखून मार्गदर्शन केले. शेवटी व्यसन विरोधी शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्रीमती संध्या खोसरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुरेखा राठोड, मंजुषा श्रीरामवार, संजय काथार व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
व्यसन प्रतिबंधक उपाय –
आदर्श व्यक्तीबद्दल तुमची निवड योग्य हवी, जीवनावश्यक कलागुण जोपासा, ध्येय प्राप्तीसाठी कष्ट करा, कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा, गुटखा, तंबाखूचे वाईट परिणाम मुलांना समजावून सांगावे, व्यसनांची शक्यता लवकर ओळखून त्यावर वेळीच उपचार करावेत, हे पदार्थ त्यांच्यापर्यंत सहज पोहोचणार नाही असे उपाय योजावेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *