
वाळुज महानगर, (ता.16)- मोडीफाय बुलेट सायलेंसरवर कारवाई करण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या वतीने गुरुवारी (ता.15) रोजी नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलिसांनी 13 बुलेटवर कारवाई करून 13 हजार 700 रुपयाचा दंड वसूल केला.
या नाकाबंदीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली 3 अधिकारी व 6 अमलदार. असे तीन पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता.15) रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान नाकाबंदी मोहीम राबवत एकुण 13 बुलेट ताब्यात घेतल्या. त्यांच्यावर कारवाई करून बुलेटला लावण्यात आलेले 10 मोडीफाय सायलेंसर जप्त करण्यात आले. तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या तीन बुलेटवर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बुलेट धारकांकडून 13 हजार 700 रुपये दंड वसूल केला.
