March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.15) – इंडो-जर्मन स्किल प्रोग्राम जीआयझेड भारताचे प्रकल्प प्रमुख मोहम्मद बद्रन आणि वरिष्ठ सल्लागार साक्षी चावला, इंडो-जर्मन ग्रीन स्किल्स प्रोग्राम यांची मसिआच्या स्ट्राईव्ह प्रोजेक्टला शुक्रवारी (ता.9) रोजी भेट देत जीआयझेडच्या नवीन ग्रीन स्किलिंग कार्यक्रम व उपक्रमाबद्दल महत्वपूर्ण चर्चा केली.

या बैठकीला मसिआचेअध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर पाटील, कार्यकारिणी सदस्य अजय गांधी यांच्यासह रवीशंकर कोरगल उपस्थित होते. मसिआ स्ट्राईव्ह प्रोजेक्टच्या अंतर्गत होणारी कार्ये तसेच संघटनेचे इतर कौशल्य उपक्रम समजून घेणे आणि जीआयझेडच्या नवीन ग्रीन स्किलिंग कार्यक्रम, उपक्रम माहिती देणे हा उद्देश असलेल्या या भेटी दरम्यान अर्जुन गायकवाड यांनी पीपीटी आणि व्हिडीओ ऑन स्ट्राइव्ह प्रकल्पाच्या माध्यमातून केलेले कार्य आणि मसिआने घेतलेले अथक परिश्रम, सुरुवातीच्या टप्प्यात आलेली आव्हाने आणि कौशल्य क्षेत्रात यश मिळवणे तसेच मसिआच्या इतर महत्वाच्या कार्याबद्दल तपशीलवार माहिती दिली. यावेळी मोहम्मद बद्रन यांनी मसिआ संघटनेच्या महिला सहभागावर प्राथमिक लक्ष केंद्रित करून ई-वाहन आणि सोलर ग्रीन स्किलिंगच्या क्षेत्रात जीआयझेडच्या कौशल्य कार्यक्रमावर चर्चा केली. तसेच सरकारी स्टेकहोल्डर्स, पॉलिसी इंटरव्हेन्शन्स, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स तयार करणे, ईव्ही, ऑटोमोबाईल उत्पादक आणि सरकारी स्टेकहोल्डर्ससह बैठका आयोजित करण्यावर चर्चा झाली. मसिआ स्ट्राईव्ह प्रोजेक्ट अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी कसे काम करतात. ते प्रत्यक्ष पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *