
वाळुज महानगर, (ता.8)- दहेगाव -सारंगपूर
ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपच्या मनीषा विक्रम राऊत तर उपसरपंचपदी विरोधी गटाचे आप्पासाहेब घुसाळे यांची मंगळवारी (ता.6) रोजी निवड झाली आहे. मनिषा राऊत यांची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहिर होताच समर्थकांनी फटाक्याची आतिशबाजी व गुलालाची उधळण करित जल्लोष साजरा केला. 
ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (ता.6) रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रिये दरम्यान सरपंच पदासाठी मनीषा राऊत व मनीषा सुतार असे दोन उमेदवारी अर्ज आले. तर उपसरपंच पदासाठी कैसर शेख व आप्पासाहेब घुसाळे
दोघांचे अर्ज आले. ते दोन्हीही वैध ठरल्याने निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत 11 ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला. त्यातील 6 मते मनीषा राऊत तर 5 मते मनीषा सुतार यांना मिळाली. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कैसर शेख यांना पाच तर आप्पासाहेब घुसाळे यांना सहा मते मिळाली. निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी ए व्ही साबदे यांनी काम पाहीले. त्यांना तलाठी पी.एस. गायकवाड, ग्रामसेवक कृष्णा किरवे यांनी मदत केली. सर्वाधिक मते मनीषा राऊत यांना मिळाल्याने त्यांची सरपंचपदी वर्णी लागल्याचे घोषित होताच राऊत समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. 
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदा कर्डीले, वैशाली गावंडे, कौसर शेख, दिपक सुतार, ग्रामपंचायत कर्मचारी किरण खाजेकर, बाबासाहेब शिंदे, भास्कर शिंदे, आरपीआय आठवले गटाचे प्रवीण नितनवरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नवनाथ सुराशे, उपसभापती सचिन काकडे, नितीन शिंदे, बद्री राऊत, सुरेश शिंदे, श्रीमंत चापे, रुस्तम सय्यद, मुस्ताक सय्यद, हमीद शेख, धोंडीराम नामेकर, शिवाजी कर्डिले, लक्ष्मण गावंडे, वसंतराव कर्डिले, अमरनाथ कर्डिले, सौरभ जाधव, श्रीपाद कर्डीले, मुन्ना शेख, अमीन शेख, इरफान पठाण आदींची उपस्थिती होती.
