March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.6) – हॅण्डल लॉक करून घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. 18 नोव्हेंबर 2023 रोजी रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेल्या या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्ता हांडगे रा.सावतानगर याने नेहमीप्रमाणे 18 नोव्हेंबर 2023 रोजी राहत्या घरासमोर दुचाकी (एम एच 20 ई एन -9447) ही हॅन्ड लॉक करून उभी केली होती. ती अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून लंपास केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उभ्या केलेल्या ठिकाणी दुचाकी दिसून आली नाही. म्हणून तीचा आजूबाजूला इतत्र शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही या प्रकरणी अज्ञात चोरट्याने विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *