
वाळूजमहानगर, (ता.5) – बजाजनगर येथे एका 29 वर्षीय कामगाराने राहत्या घरी स्कार्फच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.5) रोजी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रजत रामचंद्र अंगज (29) हा आई वडील व बहिणी सोबत सप्तश्रृंगी कॉलनी बजाजनगर येथे राहत होता. तो एका कपंनीत काम करत होता. रजत हा नेहमी प्रमाणे रविवारी रात्री घरातील त्याच्या बेडरूम झोपला होता. सोमवारी सकाळी तो उठला नाही. म्हणून त्याच्या आई वडीलांनी त्याच्या बेडरूमचा दरवाजा वजविला असता, आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी दरवाजा तोडला असता तो स्कार्पच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. ही माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास बेशुध्द अवस्थेत उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले. त्याला डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मुक्तीची नोंद करण्यात आली आहे.
