
वाळूजमहानगर, (ता.5) – एका 36 वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.5) रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास बजाजनगरात उघडकीस आली.
बजाजनगर येथील कास्मा हाऊसिंग सोसायटीत पती व दोन मुलांसह राहणाऱ्या शीतल संतोष कल्हाळे (36) हीने सोमवारी दुपारी तीचे पती बाहेर गेल्यानंतर व दोन्ही मुलेही बाहेर खेळत असताना दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास बेडरून मधील फॅनला ओढणीने गळफास घेतला. शेजारी राहणारे तीच्या घरी गेले असता ही घटना उघडकीस आली. सोसायटीतील नागरीकांमुळे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तीला बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल केले. तीला तपासुन डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
