March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.4) – ग्रामपंचायतच्या स्थानिक गटबाजीतून व आपसी हेवेदाव्यातून जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यात वाद झाल्याने बाजारपेठ बंद झाली. यावेळी अफवाचे पिक पसरल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी (ता.4) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटने प्रकरणी परस्परांच्या तक्रारी वरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर येथे रविवारी (ता.4) रोजी शेख निसार यांच्या मुलीचा लग्न समारंभ होता. या निमित्ताने मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य व पंढरपूरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आमेर दौलतखा पठाण यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. दरम्यान दगडफेक झाल्याची अफवा पसरल्याने धावपळ, पळापळ सुरू झाली. त्यामुळे वातावरण तंग झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाना बंद केल्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान पंढरपूर येथे दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या वादाप्रकरणी अमेर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी पंढरपूर येथे लग्नसमारंभ कार्यक्रमात गेलो होतो. तेथे पंढरपुर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड, चालक संतोष गरुड व फोटोग्राफर सुमेश देहाड आले होते. कार्यक्रमनंतर मी घराकडे जात असताना रमेश गायकवाड यांनी मला जवळ बोलावुन धमकावले की, तु आमच्या समाजाच्या जयंती व इतर कार्यक्रम घेवुन आमच्या लोकांचा हिरो बनतोय काय?, तुझे हे रिकामे काम सोड, नाहीतर तुला संपवुन टाकेल, असे म्हणुन धमकावुन शिवीगाळ केली. त्यावरुन गायकवाड यांना न घाबरता मी सर्व जाती धर्माचे कार्यक्रम घेणार असे बोललो. त्याचा राग मनात धरुन रमेश गायकवाड, चालक व फोटोग्राफर हे जामा मस्जीद पंढरपुर येथे येवुन मला पुन्हा शिवीगाळ करत होते. त्यांना समजावत असताना त्यांनी धक्काबुक्की केली.

तर संतोष नायबराव गरुड (43) रा. टिव्ही सेंटर जाधववाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत झाले आहे की, पंढरपुर येथे लग्न समारंभ असल्याने रमेश गायकवाड यांना तेथे सोडुन मी व सुमेश (फोटोग्राफर)असे कामगार चौकाकडे माझ्या कामासाठी जात असतांना पंढरपुर मधील जामा मस्जीद जवळ थांबुन असतांना जुबेर पठाण, आमेर पठाण व त्याचे वडील असे आले. त्यापैकी जुबेर मला म्हणाला की, कुठे आहे रमेश. त्याला जास्त मस्ती आली का? असे जोरजोरात ओरडुन शिवीगाळ करुन म्हणु लागला की, सांग त्याला माझ्या भावाच्या नादी लागु नकोस. नाहीतर त्याचे राजकारणच संपवुन टाकु?”असे म्हणुन मला जुबेर व आमेर यांनी धक्का बुक्की करीत असतांना सुमेश (फोटोग्राफर) हा मध्ये आला असता, जुबेर पठाण व आमेर पठाण यांनी आम्हाला शीवीगाळ व धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *