
वाळूजमहानगर, (ता.2) – शरीर तंदुरुस्त असले तर मन प्रसन्न राहते आणि प्रसन्न मन असले तर केलेला अभ्यास हा नेहमीच लक्षात राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच सात्विक आहारासह व्यायाम व मैदानी खेळ खेळून तंदुरुस्त रहावे. असे प्रतिपादन आरोग्य कीर्तनकार डॉ. महादेव संकपाळ यांनी केले.

रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालयात सुंदर माझी शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी व उपचार तसेच आरोग्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगेश बादले यांनी विद्यार्थी व शिक्षकांची नेत्र तपासणी केली. तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पोपटराव सावंत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन के बी मोरे, तर आभार जेष्ठ शिक्षक विलास जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस पी महाजन, आर ई शेळके, सी एस गायकवाड, आर एच शिरसाट, तुकाराम शेलार, प्रतिभा नितनवरे, राजू सांगळे, पी जी चप्पलवार, पी जी पठाडे, आर एस करपे, बी जी पांडव आदींनी परिश्रम घेतले.
