
वाळुज महानगर, (ता.26)- वाळूज येथील युवानेते रवी आढाव यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. मुंबई येथील भाजपा कार्यालयात झालेले या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे स्वागत करण्यात आले.
वाळुज येथील युवा नेतृत्व रवि आढाव पाटील यांचा मुंबई येथील भा.ज.प. पक्ष कार्यालयात प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीष महाजन यांच्या ऊपस्थितीत छत्रपती संभाजीनगरचे भा.ज.पा नेते राजु शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रामराज्य गृपचे शेकडो पदाधीकारी मुंबई येथे ऊपस्थित होते.
