March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या एका चोरट्यास वाळूज एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून 1 लाख 30 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरूवारी (ता.25) रोजी करण्यात आली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील राजेश राठोड यांची राहत्या घरा समोरून उभी केलेली दुचाकी (एमएच 20, एफ डब्लु -0626) ही अज्ञात चोरट्यांनी 15 जानेवारी रोजी लंपास केली होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात होता. तपास सुरू असतांना बजाजनगरातील जय भवानी चौक हर्ष वाईन शॉप जवळ एक जण चोरीची दुचाकी विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठ निरिक्षक अविनाश अघाव पोलिसांनी तेथे सापळा रचून जेरबंद केले. विष्णु ज्ञानेश्वर सोनवणे (21) रा.वडगाव कोल्हाटी असे या आरोपीचे नाव आहे. त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. एक लाख तीस हजार रुपये किमतीची ही दुचाकी पोलिसांनी जप्त करून अटक केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *