March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – राहत्या घरी गळफास घेऊन एका 45 वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.23) रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास बजाजनगरात उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील अमर रामदास साठे (45) रा.बजाजनगर हा पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्यासह आर एम 195/ 2 जयभावानी चौक, बजाजनगर येथे राहत होते. मंगळवारी (ता.23) रोजी रात्री अमर यांनी राहत्या घरी गच्चीवर झोक्याच्या हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. त्यांचा मोठा मुलगा अशिष व लहाण बंधु अशोक साठे यांनी त्यास बेशुध्द अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अमर यास तपासुन मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *