
वाळुज महानगर (ता.25)- संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष नबी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (ता.25) रोजी मदर तेरेसा इंग्लिश स्कूल. रामराई रोड गणेशनगर, वाळूज येथे 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांची शारीरिक कवायत पूर्ण तयारी घेण्यात आली. 
यामध्ये विद्यार्थ्यांनी कवायतीचे विविध प्रकार सादर करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्रशासकीय अधिकारी सहारा एज्युकेशन व वैद्यकीय सेवा मंडळ अफसर पटेल यांची उपस्थिती होती. या कवायतीसाठी सहशिक्षक शेख सीमा, गाडेकर वैशाली, देशमुख मोहिनी, पालोदकर दिनेश, पालवे बाळू, बनकर गणेश आदींनी परिश्रम घेतले.
