
वाळूजमहानगर, (ता.24) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी तरुण ठार झाला. हा अपघात मंगळवारी (ता.23) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास
सोलापूर धुळे महामार्ग वरील तनवाणी शाळे जवळ झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जोगेश्वरी येथील किशोर ज्ञानेश्वर जाधव (25) हा तरुण मंगळवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील तनवाणी शाळेजवळ गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ही माहिती मिळताच निलेश जाधव व योगेश त्रिबके या दोघांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून रात्री 12 वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.रंधे करीत आहे.
