March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.22) – घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल शाळेची जिल्ह्यातील उत्कृष्ट शाळा म्हणून निवड करण्यात आली. निवडीबद्दल संस्थाअध्यक्ष केशव कानिटकर यांचा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


मुंबई येथे महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज आसोसिएशन मेस्टाच्या वतीने दोन दिवशीय राज्यस्तरीय अधिवेशन, सास्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा 2024 आयोजित करण्यात आला होता. या मध्ये घाणेगाव येथील सरस्वती इंग्लिश स्कूल शाळेची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बेस्ट स्कूल अवार्ड 2024
उत्कृष्ट शाळा म्हणून निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष केशव कानिटकर, मुख्याध्यापिका सुनंदा काळे यांचा शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मेस्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच मेस्टा जिल्हाअध्यक्ष सुनिल मरकड, उपाध्यक्ष सुरेश वाघचौरे, सरपंच केशव गायके, उपसरपंच सुधाकर गायके, हनुमान भोंडवे, विजय शुक्ला, सुरेखा शिंदे, अशोक मुटकुळे, केशव जाधव, अशोक गोरे, दत्ता पवार, प्रकाश परदेशी, सरस्वतीबाई कानिटकर, संजय काळे, विलास कस्तुरे यांनी शुभेच्छा दिल्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *