March 23, 2026

 

वाळूज महानगर, (ता.18)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व बजाजनगर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत 31 संघांनी सहभाग नोंदवला. त्यात 28 शाळा सहभागी झाल्या.


या स्पर्धेचे उद्घाटन वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पुंडलिक डाके, उद्योगपती हनुमंत भोंडवे, बी.ज.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सदानंद सावळे, सचिन बोर्डे, वडगाव (को.) बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, शिवतेज इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष परदेशी, श्री गजानन विद्या मंदिरचे आय. जी. जाधव, जिल्हा परिषद मुख्याध्यापक नितीन इनामे, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूलचे कृष्णा पवार, वेलडन कॉमर्स क्लासेस संचालक गोविंद गवळी, नवीन पटेल, आदिनाथ आडसरे, बिगोद, मयूर राऊतराय, अरुण भोसले, बळीराम राठोड यांची कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेचा अंडर 14 वर्ष मुलामध्ये ”प्रथम चषक” शहीद भगतसिंग विद्यालय बजाजनगर ”द्वितीय चषक” श्री गजानन विद्या मंदिर रांजणगाव ”तृतीय चषक ” राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर या संघाने या स्पर्धेचा चषक पटकवीला. त्याच बरोबर अंडर 17 वर्ष मुले वयोगटातील” प्रथम क्रमांक ” न्यू शहीद भगतसिंग विद्यालय रांजणगाव शेणपुंजी, ” द्वितीय क्रमांक” राजा शिवाजी विद्यालय बजाजनगर, व, “तृतीय क्रमांक” सेंड जोशफ सेकंडरी इंग्लिश स्कूल बजाजनगर,

या संघाने आपापल्या वजन गटामध्ये प्राविण्य मिळविले. या स्पर्धेच्या पंचाची कामगिरी म्हणून कृष्णा पवार, योगेश चव्हाण, संदीप राठोड, गोपाल आडे, प्रतीक कोकणे, साईराज तांदळे, गोरे सर यांनी पंचाची कामगिरी वाजवली.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. कैलास जाधव, सचिव श्री शेख शफी, चंद्रशेखर जाधव, कोषाध्यक्ष श्री डी पवार, कार्यअध्यक्ष रामेश्वर वैद्य, समाधान हराळ, प्रा. नारायण शिंदे, करण लघाने, अनिल पवार, अविनाश पवार, मनीषा भारती, मीनल,बर्डे सर, जब्बार पठाण, गौतम पवार, घनश्याम जाधव, आशिष सुवर्णकार व हनुमान मंदिर ट्रस्टच्या सर्व संचालक मंडळांनी मैदानाची व्यवस्था करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलास जाधव यांनी केले तर आभार सी.के. जाधव यांनी मानले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *