
वाळूजमहानगर, (ता.16) – अहमदनगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेसाठी बजाजनगर येथील खेळाडूंचा संघ रवाना झाला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय राज्यस्तरीय रोड रेस सायकलिंग स्पर्धाचे आयोजन दिनांक 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान अहमदनगर येथे करण्यात आले असून या शालेय राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेसाठी बजाजनगर येथील शिवतेज इंटरनॅशनल स्कूलचे पाच खेळाडू शालेय सायकलींग रोड रेस स्पर्धेसाठी अहमदनगरला रवाना झाले. 17 वर्ष वयोगटाती संकेत खांडेकर (टाईम ट्रायल), गणेश मदने (प्राईम ट्रायल) व 19 वर्षे वयोगटातील गौरव सुसुंद्रे (टाईम ट्रायल), श्रीयश थोटे (ट्राईम ट्रायल), वैशाली गवई (ट्राईम ट्रायल) यांचा यात समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रा.कैलास जाधव यांचे या खेळाडूंना मार्गदर्शक लाभले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, लता लोंढे, सदानंद सावळे, सचिन बोर्डे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश परदेशी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
