March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 14 वर्ष आतील मुलांचा कबड्डी स्पर्धेत शहीद भगतसिंह हायस्कूल विद्यार्थ्यांचा कबड्डी संघ बजाजनगर परिसरामध्ये अजिंक्य ठरला. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी झाले होते. सामन्यामध्ये श्री गजानन विद्यालय या संघावर 23 गुणांनी दणदणीत विजय खेचून शहीद भगतसिंह हायस्कूलचा कबड्डी संघ विजयी ठरला.
या स्पर्धेत बेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून मंथन देशमुख याची निवड करण्यात आली. त्याला बजाजनगर सेवाभावी संस्था स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. तसेच विजेत्या संघाला मेडल, प्रमाणपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे क्युरिया इंडिया कंपनीचे डायरेक्टर मनोज डोरलीकर, अभिनव अरोरा, एच. आर. मॅनेजर दातार, सेफ्टीहेड जावळे तसेच शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव दामोदर मानकापे, उपाध्यक्ष लक्ष्मण साक्रूडकर, कोषाध्यक्ष अण्णा सावंत, सहसचिव गंगाधर शेवाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा भवलकर, शहीद भगतसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम शिंदे, शहीद भगतसिंह प्राथमिकचे मुख्याध्यापक नितीन देशमुख तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बोडखे व बर्डे यांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *