
वाळूजमहानगर, (ता.13) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमधील चिमुकल्यांनी ग्रोसरी शॉपला भेट देण्यात आली. यावेळी सह्याद्री स्कूलचे संचालक प्रभाकर म्हस्के, संचालिका निर्मला म्हस्के आणि मुख्याध्यापिका हर्षदा पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी बाल वर्गातील सर्व मुलांना किराणा दुकानात घेऊन जाण्यात आले. या लहान चिमुकल्यांना दुकानात काय काय व कोणकोणत्या वस्तू असतात. त्या कशा प्रकारे दिसतात आणि त्या वस्तू कशा प्रकारे खरेदी करायच्या याची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. यावेळी मुलांनी त्यांच्या आवडीचा खाऊ खरेदी करत आनंद घेतला. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपळकर यांची उपस्थिती होती.
