March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.7)- पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाळूज येथे शनिवारी (ता.6) रोजी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळूज ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे होते.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमजद खान पठाण, इस्माईल खान पठाण, दयानंद साबळे, नदीम झुंबरवाला, मा.चेअरमन सर्जेराव भोंड, पोपट बनकर, नंदू सोनावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम अमजद खान मित्र मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वाळूज ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष हुरखान पठाण यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी पत्रकार हा चौथा स्तंभ असुन त्यांनी समाजाला जागरूक करण्यासाठी लिखाण करावे असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बबन गायकवाड, पांडुरंग गायकवाड, वाळुज महानगर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रामराव भराड, चेअरमन सर्जेराव भोंड यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी पत्रकार भरत गायकवाड, दादासाहेब तागड, दीपक जोशी, शिवाजी तांबे, दत्तात्रेय वाघ, निलेश भारती, संजय काळे, नानासाहेब जंजाळे, विठ्ठल म्हस्के, मनोज जोशी, सुनील मुळे, नाना आल्हाट, अशोक श्रीखंडे यांच्यासह शेख शमशुद्दीन, हुसेन खान, शाहरुख खान, आजम खान, इम्तियाज खान आदीसह अनेकांची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *