March 23, 2026


वाळुजमहानगर, (ता.6)- बकवालनगर, नायगाव येथील युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे यांचा वाढदिवस श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा भूमीपूजन, गोशाळेतील गाईंना चारा वाटप, गरिबांना गरम कपडे वाटप आदी विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम कामगार वसाहतीतील श्रीराम मंदिराच्या बांधकामाचा भूमीपूजन सोहळा शिवसेना नेते (ठाकरे गट) तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर बजाजनगर येथील ह भ प बालगीरी महाराज यांच्या गोशाळेतील गाईंना चारा वाटप करण्यात आला. तसेच थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून गोरगरिबांना गरम कपड्याचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास युवासेनेचे उप तालुकाअधिकारी रमेश आरगडे यांच्या सहज जोगेश्वरीच्या रपंच योगिता आरगडेग्रा, मपंचायत सदस्य अनिल वाघ, गणेश साबळे, योगेश दळवी, प्रदीप धनक महाराज, तालुका उपप्रमुख मनोज पिंपळे. माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर राठोड, रामेश्वर आरगडे नवनाथ आरगडे, अमोल बावले, सुनील काळे, राम येळे, अभिजीत घोडके, विकी वाहुळ, कृष्णा वाकचौरे, निखिल शेजुळ, करण आरगडे, गणेश वाघ, राजू घोडके, गणेश सरगर, समर्थ पाटील उपस्थित होते.

आकर्षक मंदिराचे बांधकाम सुरू
येथील रहिवाशांनी श्रीराम मंदिर बांधकामाचा निर्णय घेतला होता. अकराशे चौरस फूट जागेवर होणाऱ्या या मंदिरास आरगडे यांनी 20 लाख रुपये दिले असून मंदिराचे बांधकाम केले जात आहे. वर्षभरात मंदिराचे काम पूर्ण करून आपण मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहू, अशी ग्वाही खैरे यांनी दिली.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *