March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.3 (बातमीदार) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या 21 वर्षी आरोपीस वाळुज एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद करून मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पळसखेड नाईक ता. जि. बुलढाणा येथील पती-पत्नी वाळूज औद्योगिक वसाहतीत मजुरी काम करून शांतीनगर रांजणगांव (शे.पु.)ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे राहत होते. त्यांनी 27 डिसेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 26 डिसेंबर रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरिता अपहरण केले. त्यानुसार वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 363, 366(अ), 376,(2 (I), 354(अ), 506 भादंविसह कलम 4,8,12 पोक्सो अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल होता.
या गुन्हयातील पिडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण आरोपी राजू प्रकाश काळे (वय 21) वर्ष रा. नेहरूनगर, सावतामाळी मंदीराजवळ रांजणगांव (शे.पु.) ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर याने केल्याची माहिती मिळाल्यावरून पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेतला असता ते निजामाबाद राज्य तेलंगणा येथे असल्याचे निष्पन्न झाले. या मुलीचे लैगिंक शोष करण्याच्या उदेशाने आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतांनासुद्धा तिला पळवून नेले होते. व तिच्या सोबत लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात निष्पण झाले. म्हणून आरोपी काळे यास 31 डिसेंबर रोजी अटक करून मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि पुंडलीक डाके, महिला पोलीस अंमलदार प्रियंका तळवंदे, पोलीस अंमलदार संदिप गाडगे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *