
वाळूजमहानगर, (ता.2) – राहत्या घरी एका 28 वर्षीय कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटन मंगळवारी (ता.2) दुपारी 2 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजु शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आनंदनगर, गारखेडा परिसर येथील अजय सुभाष साळवे हा पत्नी मंजुळासह जोगेश्वरी येथे किरायाच्या खोलीत रहात असत. ते दोघेही कंपनीत काम करत होते. मंगळवारी (ता.2) रोजी सकाळी अजय साळवेची पत्नी कंपनीत कामासाठी गेली होती. तर अजय साळवे घरीच होता. दरम्यान दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याची कंपनीतुन घरी आली. तेव्हा घराचा दरवाजा आतुन बंद होता. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने मंजुळा साळवे हिने घरमालक व शेजाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी घराचा दरवाजा तोडला असता अजयने घरातील छताच्या लोखंडी ॲग्लला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला योगेश साळवे व राजेश गायकवाड यांच्या मदतीने बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले. त्याला डॉक्टरांनी तपासून सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुरेश तारव करीत आहे.
