February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.29) – मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा म्हणून नागेश कुठारे यांनी दिलेल्या उपसरपंच पदाच्या राजीनामा नंतर रिक्त झालेल्या तीसगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (ता.29) रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रवीण हांडे विजयी झाले.

तिसगाव येथे उपसरपंचाची निवड करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. वेळी उपसरपंच पदासाठी प्रवीण हांडे, नितीन जाधव, गणेश बिरंगळ व संजय जाधव यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. संजय जाधव व गणेश बिरंगळ या दोघांनी अर्ज मागे घेतल्याने प्रवीण हांडे व नितीन जाधव हे दोन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात राहिले. निवडणुकीत हांडे यांना 10 तर जाधव यांना 7 मते मिळाल्याने अध्यासी अधिकारी एस. आर. लोळगे यांनी अंडे यांना विजयी घोषित केले. त्यावेळी सहायक अध्यासी अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड, तलाठी संजय पवार यांनी काम पाहिले. मतदान प्रक्रियेत सरपंच शकुंतला कसुरे, प्रवीण हांडे, ग्रामपंचायत सदस्य नागेश कुठारे, राजेश कसुरे, गणेश बिरंगळ, विष्णू जाधव, नितीन जाधव, कृष्णा गायकवाड, संजय जाधव, अरुणा जाधव, अश्विनी जाधव, पूजा तरैय्यावाले, रेणुका सलामपुरे, गोदावरी कोल्हे, संगीता अंभोरे, रेखा सूर्यवंशी व निर्मला बुट्टे या सर्व 17 सदस्यांनी भाग घेतला. उपसरपंचपदी प्रवीण हांडे यांची निवड होताच जल्लोष करून हांडे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य रामचंद्र कसुरे, वडगावचे सरपंच सुनील काळे, उद्योजक हनुमान भोंडवे, पोपट हांडे, उषा हांडे, रायभान शेलार आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

आरक्षणासाठी उपसरपंच पदाचा राजीनामा –
तिसगाव ग्रामपंचायतचे तत्कालीन उपसरपंच नागेश कुठारे यांनी 30 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मराठा व धनगर समाजाच्या अरक्षणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *