February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.27) – महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2023 दरम्यान मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी 18 वर्षाखालील (जुनिअर) गटात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या संघामध्ये सिडको वाळूज महानगर येथील वंश वावरे पाटील याची निवड झाली आहे. ही निवड चाचणी 18 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रिडांगणावर घेण्यात आली.

याबाबत नितीन वावरे पाटील यांनी सांगितले की,  निवड चाचणीसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी आदी ठिकाणीवरुन खेळाडू सामील झाले होते. निवड कमिटीमध्ये महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संभाजीनगर विभागाचे विभागीय सचिव आबासाहेब शिरसाठ, अभिषेक गणोरकर, लोकेश ठाकरे आदी सहभागी होते. वंश हा 2021 मध्ये नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सब जुनिअर व्हॉलीबॉल स्पर्धेचा संभाजीनगर विभागाच्या उपविजेत्याचा संघाचा देखील खेळाडू आहे. तसेंच जिल्ह्यात झालेल्या अनेक व्हॉलीबॉल स्पर्धेत देखील त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. वंश हा सिडको महानगर, संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कॅनपॅक कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक नितीन वावरे पाटील यांचा मुलगा आहे.

या निवडीसाठी त्याचे विष्णू जाधव, नागेश कुठारे, राजेश कसुरे, सर्जेराव चव्हाण, अर्जुन आदमाने, अमोल काळे पाटील, अतुल दाभाडे, महेश गुजर, अण्णासाहेब जाधव, नितीन कांजूने, मनोज गर्जे, किरण राहते, कल्पेश शिरसाठ, शिवाजी हिवाळे, नितीन जाधव आदींनी स्वागत केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *