March 25, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – वाळूज परिसरात सिडकोतील एका उच्चभ्रु सोसायटीत कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन पिडीत महिलाची सुटका करून एका दलाल महिलेला जेरबंद केले. आरोपीच्या ताब्यातून कंडोमसह 3 हजार 200 जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (ता.25) रोजी सायंकाळी करण्यात आली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर येथील हॉटेल कंदील जवळ सबप्राईड अपार्टमेंट या उच्चभ्रु सोसायटीत वंदना उर्फ मनिषा संजय देशमुख (39), रा. पणकन्हेगाव ता. सेनगाव हिंगोली. ही महिला ते 33 व 39 वर्षीय दोन महिलांना जागा उपलब्ध करून देत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेऊन कुंटनखाना चालवीत होती. ही माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहायक पोलीस निरीक्षक गौतम कावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश शेळके, सुरज अग्रवाल, हनुमान ठोके, राजाभाऊ कोल्हे, सुरेश कच्चे, नवाब शेख, धिरज काबलिये आदींच्या पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून छापा मारला.

सोमवारी (ता.25) सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत कुंटणखाना चालवणारी दलाल आंटी वंदना उर्फ मनिषा देशमुख हिस ताब्यात घेतले. यानंतर दोन पिडीत महिलांची कुंटनखान्यातुन सुटका केली. अटकेतील आरोपी दलाल व तेथे असलेल्या महिलांकडून कंडोमसह 3 हजार 200 रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी दलाल वंदना उर्फ मनीषा देशमुख हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *