February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.23)- – वाळूज परिसरातील सिडको वाळूज महानगर येथे वृक्ष वृक्ष बँकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक देशी, आयुर्वेदिक व दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करून हरितक्रांती निर्माण करणार्या पर्यावरण प्रेमी पोपट रसाळ यांना देशातील सर्वोच्च पर्यावरण विभागातील “चेंज मेकर पुरस्कार” (गोल्ड मेडल) दिल्ली येथे शुक्रवारी (ता.22) रोजी देण्यात आला. हा पुरस्कार रसाळ यांना सलग दोन वर्ष मिळाल्याचा बहुमान मिळाला.

वाळूज येथील एका कंपनीत कामगार असलेल्या पोपट रसाळ यांनी पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणेतून तसेच सिने अभिनेते व पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून झाडांच्या बँक चालू करून एकूण 1 लाख 19 हजार 793 पर्यावरण पूरक देशी आयुर्वेदिक व दुर्मिळ प्रजातींच्या झाडांची लागवड करत हरितक्रांती निर्माण केली. या कार्याची दखल घेऊन
भारतीय एअरटेलच्या वतीने चेअरमन सुनील मित्तल व भारती फाउंडेशनचे संचालक राकेश मित्तल तसेच भारती फाउंडेशनच्या (सीईओ) ममता सायकीया यांच्या हस्ते दिल्ली येथे पोपट रसाळ यांना हा पुरस्कार 22 डिसेंबर 2023 रोजी देण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *