वाळुज महानगर, (ता.18) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (ता.17) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गरवारे कंपनी जवळ झाला. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की,
प्रशांत माधव श्रीरसागर तालुका निलंगा जिल्हा लातूर वय 23 वर्ष हे रविवारी (ता.17) रोजी दुचाकीवरून जात होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन पसार झाला. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील गरवारे कंपनी समोर झालेल्या या अपघातात क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले. 
अपघाताची माहिती मिळताच लिंबे जळगाव पॉईंटवर असणारी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची 24 तास सेवेत असणारी विनामूल्य ॲम्बुलन्सचे चालक संदीप त्रिंबके यांनी त्वरित अपघात ग्रस्त ठिकाणी हजर होऊन जखमींना जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.
