February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.17) – बजाजनगर येथे खेळता खेळता पाण्यात पडून बुडाल्याने दोघा सख्ख्या बहिण भावाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असतात त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील महिला कामगार विद्या राहुल देशमुख (35), या स्टार लाइट कंपनी समोर, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर येथील तानाजी सरडे यांच्याकडे भाड्याने राहतात. त्यांची मुलगी चैताली (10) व मुलगा समर्थ (7) हे दोन्ही मुलं खेळता खेळता आरोपी अशोक शिनगारे व नितीन गायकवाड यांनी इमारतीच्या पायाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्ड्यात पडून दोघेही मरण पावले.
शुक्रवारी (ता.15) रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत प्रकरणी विद्या देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

आरोपी अशोक शिंगारे व नितीन गायकवाड यांनी खोदून ठेवलेल्या खड्याच्या आजुबाजुला कोणतीही सुरक्षा न बाळगता ऊघडाच सांडपाणी भरून ठेवल्याने विद्या देशमुख यांचे दोन मुले हे खड्ड्यात बुडून मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाले म्हणुन दोन्ही आरोपी विरुद्ध कलम 304(अ), 34 भादंवि.प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सचिन डाके यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *