March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.9 – महसूल विभाग अंतर्गत कार्यरत तहसील कार्यालय गंगापूर येथील कोतवाल संघटनेची बैठक तहसील कार्यालयात झाली. यावेळी तालुकाध्यक्षपदी संतोष कुंजारें तर उपाध्यक्षपदी सिराज शेख यांची निवड करण्यात आली.

यावेळी त्यांचा अप्पर तहसीलदार आकाश दहाडदे, नायब तहसीलदार गौरव खैरनार यांच्या हस्ते पुषगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढील प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात सचिव अमोल खैरनार, कार्याध्यक्ष गणेश गवते, संघटक प्रशांत दाभाडे तर सहसंघटकपदी सुनील तागड यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य अरुण गिरबोने, अमोल राऊत, सतीश दळे, अनिल फाजगे, उत्तम सोनवणे, रमेश भुजंग, सचिन तुपे, प्रकाश हिवाळे, बबन बनसोडे, विलास ताठे, नसिर शेख, रामेश्वर सपकाळ, कलीम शेख, बाबुराव खंडागळे, वर्षा कर्डिले, भाऊलाल गायकवाड, गणेश जाधव, बिजलाताई पवार, सांडू बन, बाबुलाल शेख उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *