
वाळूजमहानगर, (ता.2) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने कंपनीतुन घरी जाणाऱ्या 46 वर्षीय कामगाराला जोराची धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन ठार झाला. जोगेश्वरी ते रांजणगाव (शेपू), दरम्यान सोमवारी (ता.27) रोजी रात्री 7.15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या अपघाता विषयी मिळालेली माहिती अशी की, पोपट फकिरराव बनकर (46) रा- गणेशनगर, जोगेश्वरी, ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर
हा कामगार सोमवारी (ता.27) रोजी रात्री 7.15 वाजेच्या सुमारास कंपनीतून पायी घराकडे येत असताना अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हयगयी व निष्काळजीपणाने चालवुन पादचारी बनकर यास पाठीमागून जोराची धडक देऊन जखमी केले. व त्याला उपचारार्थ दाखल न करता व अपघाताची खबर न देता निघुन गेला. याप्रकरणी रवींद्र पोपट बनकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 304 (अ), 279, 337, 338, मोवाका. 134, 177, 184 प्रमाणे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
