
वाळूजमहानगर, (ता.2) – विकसीत भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ रांजणगाव (शेणपुंजी) येथुन शुक्रवारी (ता.1) रोजी करण्यात आला. या यात्रेत केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनेची माहीती सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येते. तसेच व्हिडिओ चित्रीकरण दाखवुन योजनेचा लाभ कसा मिळवुन घ्यायचा याबाबद सांगितल्या जाते.

या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य दिपक बडे सरपंच योगीता प्रभाकर महालकर, गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा परदेशी, उपसरपंच शिवराम ठोंबरे, दत्तू हिवाळे, बाबुराव हिवाळे, साईनाथ जाधव, पंकज हिवाळे, जावेद सय्यद, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे वैद्यकीय अधिकारी प्रशांत दाते, विस्तार अधिकारी भारत घुगे, विकार अधिकारी अशोक घोडके, अशोक जाधव, कांता जाधव, जि.प शाळेचे मुख्याध्यापक विजय चौधरी, विकास सवई यांच्या उपस्थीतीमध्ये हिरवा झेंडा दाखवुन या यात्रेची सुरवात करण्यात
आली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक बडे यांनी तर आभार दत्तू हिवाळे यांनी मानले.
