February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.30) – महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिरचा मुला मुलींचा संघ गुरुवारी (ता.30) रोजी रवाना झाला.

या स्पर्धा जळगाव येथील नूतन मराठा कॉलेज येथे स्पर्धा 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या सामन्याकरीता रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिर शाळेच्या 4 मुली व 2 मुले छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. वयोगट 18 वर्षाआतील मुलं व मुलींसाठी ही स्पर्धा या करिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आय जी जाधव, सचिव हरीश जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मष्णाजी शिनगारे, विभागप्रमुख संजय तुपे, दीपक कोळी, पुजा गिरी, निलेश पाटील, दीपक पठारे, प्रवीण पाईकराव, क्रीडा शिक्षक जब्बार पठाण प्रयत्नशील आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *