वाळूजमहानगर, (ता.26) – अखिल भारतीय श्री स्वामी सेवा मार्गाच्या बाल संस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील सिडको वाळूज महानगरात रविवारी (ता.26) व सोमवारी (ता.27) नोव्हेंबर 2023 रोजी परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात भव्य “मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृ-पितृ पाद्यपूजन सोहळा” आयोजित करण्यात आला आहे.
यात विविध विषयावरील उभारण्यात आलेली मूल्यसंस्कार ज्ञानदालन प्रमुख आकर्षण ठरणार आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून समाज प्रबोधनासाठी आयोजित करण्यात आला आहे. प्रथम रविवारी सकाळी बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा काढून कार्यक्रमाच्या उद्घाटनाने या सोहळ्यास सुरुवात झाली.
