February 5, 2026


वाळूजमहानगर (ता.19) – सिमेंट काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक अशा जवळजवळ पावणे दोन कोटी रुपयाच्या विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण वाळूज परिसरातील रांजणगाव (शे.पु) येथे रविवारी (ता.19) रोजी करण्यात आले.

आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य दिपक बडे, सरपंच योगीता प्रभाकर महालकर, उपसरपंच शिवराम ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्या उषा दिवाळे. माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मोहिणीराज धनवटे, पंकज हिवाळे, संतोष लोडकरे, जावेद सय्यद, बाबुराव हिवाळे, अशोक जाधव, दिपक सदावर्ते, भिमराव किर्तीकर, गोरखनाथ शेळके, रतन बत्तीसे, जमील शेख उपस्थित होते.


यावेळी राज कॉलनी प्रभाग क्र 6 मध्ये सिमेंट रस्ता 20 लक्ष रूपये, बिलाल मज्जीत रस्ता पेकर ब्लॉक बसविणे 3 लक्ष रूपये तसेच दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत कामाचे लोकार्पण यामध्ये पवननगर 10 लक्ष रुपये, अर्जुननगर 10 लक्ष रुपये, मातोश्री नगर 10 लक्ष रुपये, साईनगर 10 लक्ष रुपये, भारतनगर, दत्तनगर, एकतानगर अशा विविध ठिकाणी विकास कामांचे उद्घाटन झाले.
पावणे दोन कोटीचा निधी
या सर्व कामासाठी जवळजवळ 1 कोटी 73 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी सांगितले. कार्यक्रमास गणेश हिवाळे, किरण धिरडे, सोमनाथ नेमाने, मनोज सोनवणे, विलास देशमुख, संजय भोसले, राजु धोंगडे, सोमनाथ कानडे, रवि चव्हाण, अमोल जाधव, गोपाल वर्मा, सलीम शेख, सुधाकर मुरदार, शेख सलीम, ताहेर शेख, राजु पठाण, माधव कावरखे पाटील उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *