
वाळूजमहानगर (ता.17) – भरधाव जाणाऱ्या शहरबसने एका वृद्ध महिलेला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती ठार झाली. पंढरपूर येथील तिरंगा चौकात शुक्रवारी (ता.17) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शे.पु.) ता.गंगापूर जि. छञपती संभाजीनगर येथील दोंदाबाई लक्ष्मण गुठे वय 88 वर्षे या वृद्ध महिलेला शुक्रवारी (ता.17) रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील तिरंगा चौकातून छत्रपती संभाजीनगर ते जोगेश्वरी या शहर बस (एम एच 20, ई एल 1930) ने जोराची धडक दिली. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ती गंभीर जखमी झाली. वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ए.एस. भाले व प्रविण सुदाम राठोड यांनी तिला घाटी हॉस्पीटल मध्ये अपघात विभागात आणुन दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून 12.15 वाजेच्या सुमारास मृत घोषीत केले. या प्रकरणी घाटी हॉस्पिटल मधून डॉ. दिपीका शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सय्यद हे करीत आहे.
