वाळूजमहानगर (ता.13) – दिपावली या सणाचे औचित्य साधुन बजाजनगर येथे प्रथमच सामाजिक विचार मंचच्या वतीने स्वरम दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून व शारदा देवी प्रतिमेचे पूजन करून गजानन नांदुरकर, विजय देशमुख, केशव ढोले, संजय छाजेड, रेखा हिंगणकर, मिनल देशमुख, रेखा नांदुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिवाळी पहाट या कार्यक्रमात विजय धोंडगे व सहकार्यांनी भक्ती गीते, प्रभात गीते, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, दिवाळीची गाणी, वासुदेवाची गाणी इत्यादी गीत सादर करत रसिक वृंदाना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी शिवाजी राऊत, बबनराव सुपेकर, अमर निकम, बी.जी.पाटील, संजय फलटणे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून सारंग पाडाळकर व रवींद्र शेलगावकर तर उपस्थितांचे आभार दिलीप दबडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नंदकुमार कुलकर्णी, माणिक कुंभार, विश्वनाथ धोंडगे, विनोद वडोदकर, रघुनाथ पेहलवान, सुरेश वंजारी, भारती शेलगावकर, किरण हणमंते, मोना राजपूत, संगीता पाटील, सविता राऊत आदींनी परिश्रम घेतले.
