February 5, 2026

 


वाळूजमहानगर (ता.11) – दिवाळीनिमित्त रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले दुकान बंद करून घरीगेल्यानंतर आग लागली. आणि लाखो रुपये किमतीचा विविध प्रकारचा दुकानातील कपड्याचा ऐवज जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (ता.11) रोजी सकाळी उघडकीस आली. आगीचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.

सध्या सर्वत्र दिवाळीचा धुमधडाका सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र खरेदीची लगबग आहे. परिणामी व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले व्यवसाय सुरू ठेवून ग्राहकांची सेवा करतात. बजाजनगर येथील भगवान जनार्दन मुळे पाटील यांचे गोरख वाघ चौकात गायत्री कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ग्रहक सुरू असल्याने दुकानही उशिरापर्यंत सुरू होते. त्यानंतर दुकान बंद करून मुळे हे शेजारीच असलेल्या घरी झोपण्यासाठी गेले. रात्री त्यांच्या दुकानाला आग लागून दुकानातील सर्व ऐवज जळून खाक झाला. ही घटना शनिवारी (ता.11) रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज अग्निशमन दलाने धाव घेतली.

मात्र तोपर्यंत दुकानातील साड्या रेडीमेड शूटिंग शर्टिंग असा लाखो रुपये किमतीच्या कपड्याचा ऐवज जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडेपाटील, दत्तू भंडे, अशोक सोमासे, योगेश मगर आदींनी हळहळ व्यक्त केली. आगीचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *