
वाळूजमहानगर (ता.9) – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये दिवाळी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, प्रभाकर म्हस्के, प्रमुख पाहुणे विष्णुदास पाटील, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, यांची उपस्थिती होती. 
यानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनवलेले दिवे आणि आकाश कंदील आणले होते. ते व्यवस्थित सजवल्याने आकाश कंदील आणि दिव्याच्या रोषणाई मध्ये शाळा उजळून निघाली होती. 
शिक्षिकांनी शाळेच्या पटांगणापासून सर्व वर्गांपर्यंत सुंदर आणि सुबक तसेच समाज प्रबोधनात्मक संदेश मिळेल अशा विविध रांगोळ्या काढल्या होत्या. पहिल्या रांगोळी मधून सर्व शिक्षा अभियान दर्शविण्यात आले. 
- दुसरी रांगोळी म्हणजे चंद्रयान, ही रांगोळी विविध धान्यापासून बनवलेली होती. यासाठी एकूण 60 किलो धान्य वापरण्यात आले. यामध्ये वापरलेले रंग हे खाण्याचे रंग आहेत जेणे करून हे धान्य वाया जाणार नाही, त्याचा उपयोग आपण प्राणी पक्षी याना खाण्यास देऊ शकतो.

ही रांगोळी एकूण 5 बाय 10 फूट आकाराची होती. आणि विशेष आकर्षण म्हणजे 5 दिवसाच्या दिवाळीचा देखावा, आजकाल मुलांमध्ये आपल्या संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. 
म्हणून त्यांना आपले सण आणि चालीरीती यांची सखोल माहिती मिळावी हा उद्देश ठेवून ही सजावट केली होती. यामध्ये दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, अभ्यंगस्नान, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या 5 दिवसांची हुबेहूब पूजा मांडण्यात आली होती. 
यासाठी संचालिका निर्मला म्हस्के यांचे मार्गदर्शन मिळाले. किड्स कॅम्ब्रीज स्कूल मध्ये दीपावलीचा हा उत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
पारंपरिक सणाची सजावट पाहून पालकाकडून खूप चांगले अभिप्राय मिळाले. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, सुवर्णा जोशी, रुपाली उपलकर, रुपाली चौधरी,
वंदना कदम, शीतल चौधरी, वीणा कंन्नावर, सुवर्णा कदम, भाग्यश्री मुळे, मोनिका चतुर्भुज, मयुरी पवार,
सरिता डावखर, राणी कांबळे, सई राणे, कुणाल शिंदे तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
