
वाळूजमहानगर (ता.06) – दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह सिडको वाळूज महानगर -1 येथील सूर्यवंशीनगरातील विहिरीत सोमवारी (ता.5) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आढळून आला. तिने आत्महत्या केली की, तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. हे मात्र समजू शकले नाही. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिडको वाळूज महानगर -1 येथील सूर्यवंशीनगरात रुपाली सुशिल सुर्यवंशी, भागाबाई देविचंद सुर्यवंशी, लखन देवचंद सुर्ययवंशी, दिड वर्षापूर्वी लग्न झालेली देविका लखन सुर्यवंशी असे सर्वजण कुटुंबासह राहतात. त्यांच्याकडे दोन गाई असुन त्या रोज कमलसिंह सुर्यवंशी यांच्या शेतात चरण्यासठी बांधुन ठेवतात. व अधुन मधुन ते गाईकडे जात असत. सोमवारी (ता.6) रोजी दुपारी 3 वाजे दरम्यान देविका एकटीच गाईकडे चक्कर मारण्यासाठी गेली. पंरतु बराच वेळ झाला तरी देविका घरी परत आली नाही. म्हणुन रुपाली सुशिल सुर्यवंशी, लैला संजय सुर्यवंशी या देविकाला शोधण्यासाठी कमलसिंह सुर्यवंशीच्या शेतात गेल्या. पंरतु ती तिथे दिसली नाही. म्हणुन ती नेहमी गाईला गवत घेण्यासाठी कमलसिंमग सुर्यवंशा यांच्या शेतातील विहीरी पलीकडे असलेल्या मोकळ्या जागेत जाते. तिकडे जाऊन पाहीले असता विहीरीमध्ये करडी साडी, लाल ब्लाउज असलेल्या महीलेचे प्रेत तरंगताना दिसले. साडी पाहुन ती देविका असल्याचे वाटले. म्हणुन तात्काळ दुर्गा कमलसिंग सुर्यवंशी यांना फोन करुन सांगीतले. व त्यांना तिथे बालावले. तेव्हा तिथे सुशील सुर्यवंशी, कमलसिंग सुर्यवंशी व तुळसीराम असे आले. तो मृतदेह देविकाचा असल्याचा खात्री होताच कमलसिंग सुर्यवंशी यांनी पोलीसांना फोन करून घटना सांगीतली. याप्रकरणी रुपाली सुशिल सुर्यवंशी वय 32 वर्षे रा. सुर्यवंशीनगर सिडको वाळूज महानगर- 1, ता. जि छञपती संभाजीनगर यांच्या खबरीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
